गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे 'राव'ज अकॅडमी आणि जिल्हा कबड्डी संघटनेने उभारलेल्या कबड्डी अकॅडमीला त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाया भक्कम असेल तर खेळाडू चांगला घडतो. त्यामुळे पहिल्यापासूनच तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कबड्डीपटूंनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःची वेगळी ओळख तयार करून आदर्श निर्माण करावा. कबड्डीमुळे मला सर्वकाही मिळाले. त्यात महानायक अमिताभ बच्चन यांची भेट, विमानप्रवास, आदींचा समावेश आहे. कोल्हापूरकरांशी नातेही निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडीगिरी, ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार, उमा भोसले-भेंडीगिरी, राधिका रेड्डी, मानसिंग पाटील, अण्णासाहेब गावडे उपस्थित होते.
चौकट
कोल्हापूरकरांनी योग्य नियोजन करावे
कोल्हापूरमधून प्रो-कबड्डीला अनेक खेळाडून मिळाले आहेत. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लागत आहे. कोल्हापूरकरांनी योग्य पद्धतीने नियोजन केल्यास येथून अनेक खेळाडू घडतील, असे रेड्डी यांनी सांगितले.
प्रशिक्षक रेड्डी म्हणाले
१) अन्य खेळांप्रमाणे कबड्डीच्या विकासासाठी ग्रासरुटपासून प्रयत्नांची गरज
२) पी.टी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी कबड्डी अकॅडमीकडे पाठविणे आवश्यक
३) शासनाचे पाठबळ, लोकप्रतिनिधींची कार्यवाही, अकॅडमी आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे
फोटो (२४०८२०२१-कोल-कबड्डी फोटो) : गोकुळ शिरगाव येथे मंगळवारी भारतीय कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा सपत्निक सत्कार कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अजित पाटील, रमेश भेंडीगिरी, सुभाष पवार, उमा भोसले-भेंडीगिरी, अण्णासाहेब गावडे, मानसिंग पाटील उपस्थित होते.