कोल्हापूर : पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून बोंद्रेनगर, लक्षतीर्थ वसाहत परिसरातील गुंडांच्या टोळ्यांचा संघर्ष टोकाला पोहोचला. गेल्यावर्षी मे महिन्यात वाढदिवसाचा फलक फाडल्याच्या कारणावरून रिंकू देसाई आणि त्याच्या टोळीतील हल्लेखोरांनी गुंड संतोष बोडके याच्या हाताची तीन बोटे तोडली होती. त्याचा बदला प्रकाश बोडकेचा हात तोडून घेतल्याची चर्चा सध्या बोंद्रेनगर परिसरात सुरू आहे.रिंकू देसाई याच्या वाढदिवसानिमित्त लावलेला फलक फाडल्याच्या कारणावरून लक्षतीर्थ वसाहतीमधील गुंड संतोष सोनबा बोडके (वय ३०) याच्यावर १४ मे २०२२ मध्ये प्रकाश बोडके आणि त्याच्या १३ साथीदारांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात संतोषची उजव्या हाताची तीन बोटे तुटली.१२ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संतोषवर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. ९ मे २०२३ पासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. बोटे तोडल्याच्या रागातून संतोषच्या टोळीतील तरुणांचा विरोधी टोळीवर राग होता. त्याच रागातून प्रकाशचा हात तोडल्याची चर्चा बोंद्रेनगर परिसरात आहे. जखमी प्रकाश बोडके याच्यावर यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संशयितांच्या शोधासाठी चार पथकेहल्ल्यानंतर जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, करवीर पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले. चॉकलेटी रंगाच्या कारमधून संशयित गगनबावड्याच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.
बंदोबस्त तैनातगेल्यावर्षी मे महिन्यात संतोष बोडके याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे पडसाद बोंद्रेनगर आणि लक्षतीर्थ वसाहतीत उमटले होते. आता प्रकाश बोडके याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी लक्ष्मीपुरी आणि करवीर पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहतीसह बोंद्रेनगरमध्ये बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, सीपीआर आणि राजारामपुरीतील खासगी हॉस्पिटलबाहेर तरुणांची मोठी गर्दी जमली.
प्रत्यक्षदर्शींना धक्काकन्सलटन्सी ऑफिसमधील महिलेने हल्ल्याची घटना पाहिली. तसेच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे देशपांडे कुटुंबीयांच्या मोलकरणीनेही घटना पाहिली. घाबरलेल्या मोलकरणीने तातडीने घराचा दरवाजा बंद करून घेतला. आरडाओरडा आणि रक्त पाहून प्रत्यक्षदर्शींना धक्का बसला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. शहर पोलिस उपअधीक्षक टिके यांच्यासह निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.