एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीमध्ये गुन्हेगारी गँगमध्ये वावरताना त्याची ‘टपोरी’ म्हणून ओळख. गुन्हेगारीमधून मिळालेल्या पैशांतून जुगार,क्लब, सावकारकी सुरू केली आणि बघता-बघता तो ‘प्रोफेशनल सावकार’ बनला. गुंडांची फळी सोबत घेऊन ‘एसएस गँग’च्या नावाखाली वसुलीचा सपाटा लावला. डिपार्टमेंटला हाताशी धरून पैसा, जमिनी, फ्लॅट, आलिशान वाहनेत्याने मिळविली. टपोरी ते प्रोफेशनल सावकार असा त्याचा प्रवासअखेर कोठडीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. ‘खासगी सावकार’ सूरज साखरेवर झालेल्या ‘मोक्का’ कारवाईचा सिग्नल अनेक सावकारांना सावध करणारा आहे.सूरज साखरे याची घरची परिस्थिती गरिबीची होती. आई-वडील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये भाड्याच्या घरी राहत होते. लक्षतीर्थ वसाहतची ‘दांडगाईवाडी’ म्हणून ओळख आहे. येथे गल्ली-बोळात फाळकूटदादांच्या गँगच्या सहवासात राहून सूरज साखरेही टपोरी गुन्हेगार बनला. हाणामारी, वसुलीमधून त्याला पैसा मिळू लागला.काही अवैध व्यावसायिकांशी हातमिळवणी करून त्याने जुगारात पाय रोवले. पीरवाडी (ता. करवीर) येथील माळरानावर साई कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावेजुगार अड्डा सुरू केला. या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा टाकून साखरेसह १९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, ११ दुचाकी, एक कार, २२ मोबाईल आणि गॅस सिलिंंडर असा सुमारे १२ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या सादळे-मादळे (ता. करवीर) येथील सिल्व्हर व्हॅली या लॉजिंगवर पोलिसांनी १८ आॅक्टोबर, २०१८ रोजी छापा टाकून तीनपानी जुगार खेळणाऱ्या तेराजणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सव्वा लाख रुपये आणि ११ मोबाईल असा सुमारेदोन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून याप्रकरणीकटाचा सूत्रधार अमोल पवार आणि त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता कोल्हापूर शहर आणि उपनगरांतील खासगी सावकारांकडून त्यांनी सुमारे तीन कोटी ६० लाख रुपये कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले.या गुन्ह्यामध्ये सावकार सूरज साखरे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. आर्थिक व्यवहारातून त्याच्या देवकर पाणंद येथील कार्यालयावर हल्ला झाला होता. सानेगुरुजी वसाहत परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकल्याचा गुन्हा त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.बांधकाम व्यावसायिकांना सावकारकी पाशात ओढून करोडो रुपयांतून एक कंपनी सुरू केली. बुलडोझर, पोकलँड, जेसीबी मशिनरी खरेदी केल्या.सामाजिक कार्यातून छबीसूरज साखरे याची सावकारकी जोरात सुरू होती. संभाजीनगरबसस्थानक आणि देवकर पाणंद येथे आलिशान फ्लॅट खरेदी करून तो कुटुंबासह राहू लागला. भागात मोठ्याने वाढदिवस साजरा करणे,भाजीपाला मोफत वाटणे अशा सामाजिक कार्यातून तो आपली छबीनिर्माण करत असे. वर्षापूर्वी त्याने पत्नीला एका पक्षाचे पदाधिकारीबनविले. फौंडेशनच्या माध्यमातून त्याने सामाजिक कार्यात जोरदार सहभाग घेतला होता.
सूरज साखरे टपोरी ते प्रोफेशनल सावकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 1:04 AM