शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

सुरेश कमळेंना अखेर हाकलले

By admin | Published: June 23, 2015 12:35 AM

जिल्हा परिषदेचा निर्णय : पाणी योजनातील गैरकारभार नडला; जीवन प्राधिकरणाकडे रवानगी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश भीमराव कमळे यांना अखेर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सेवेतून हाकलले. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, तेरवाड, चिपरी या पाणीपुरवठा योजनांमधील गैरकारभार कमळे यांना नडला असून, त्यांची रवानगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. गणेशवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेचे ७० टक्के काम पूर्ण होऊनही संबंधितांना पहिल्या हप्त्याची रक्कम न दिल्याने ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार केली होती. त्याचबरोबर तेरवाड व कवठेसार येथील नळपाणी योजनेच्या मोजमाप नोंदवहीमध्ये तफावत आढळली होती. याबाबत त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चिपरी येथील नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या वॉटर मीटर कामांचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाले होते. या सर्व प्रकरणांबाबत कमळे यांच्याकडे खुलासा मागितला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष व काही सदस्यांनी उपविभाग शिरोळ येथे भेट दिली असता ते मुख्यालयी हजर नव्हते. याबाबतही त्यांच्याकडे खुलासा मागितला होता; पण ते याबाबत काहीच खुलासा करू शकले नाहीत. यावरून त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाल्याने सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी त्यांना कार्यमुक्त केले. सुरेश कमळे हे प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत उपअभियंता पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करता येत नसल्याने त्यांना कार्यमुक्त केले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात तर ‘आता कोणाचा क्रमांक’, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. जिल्हा परिषदेच्या सभेतही त्यांच्या कारभारवर जोरदार टीका झाली होती. (प्रतिनिधी)