कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासाठी जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे मदत निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी दिल्ली एनडीआरएफचे पथक आठवड्यात कोल्हापुरात दाखल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या नुकसानीचे नुकतेच दिल्लीमध्ये सादरीकरण करण्यात आले. पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन जलद करण्यासाठी जागतिक बँक व एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर महापुराची कारणे, पावसाची अनियमितता, महापुराचे स्वरूप, महापुरानंतर विस्कळीत झालेली आरोग्य सेवा, झालेले नुकसान याचा विचार करून निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्ली एनडीआरएफचे एक पथक येत्या आठवडाभरात कोल्हापुरात दाखल होणार आहे.
त्या पथकामार्फत कोल्हापूर शहरात शाहूपुरी, जयंती नाला, शिवाजी पूल, चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुका, खिद्रापूर या ठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियोेजन