शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
5
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
6
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
7
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
8
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
9
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
10
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
11
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
12
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
13
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
14
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
15
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
16
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
17
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
19
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
20
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात; रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 13:43 IST

''व्यापार, पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर स्थानकातून रेल्वे सेवा सुरू कराव्यात''

कोल्हापूर : कोल्हापूर ते वैभववाडीरेल्वे मार्गासाठी अंतिम टप्प्यातील सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोमवारी दिली. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्निनन्सची पाहणी केली.महाव्यवस्थापक यादव म्हणाले, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. त्यामध्ये गगनबावडा परिसरात काम सुरू आहे. काही महिन्यांत हे काम संपेल. या मार्गात घाट विभाग असल्याने जादा निधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान यादव यांनी सोमवारी सकाळी रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकारी रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून का दिली जात नाही, प्रवासी संघटनांनी मागण्यांचे गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे, असा प्रश्न अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, कोल्हापूर रेल्वे पॅसेंजर संघटनेचे शिवनाथ बियाणी यांनी विचारला. त्यावेळी यासंदर्भात चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या व्यापार, पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर स्थानकातून रेल्वे सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी केली. विभागीय रेल्वे प्रबंधक इंदू दुबे उपस्थित होत्या.

या केल्या मागण्या

  • कोल्हापूर ते मुंबईदरम्यान दुरान्तो एक्स्प्रेस, वंदे भारतच्या धर्तीवर सुपरफास्ट रेल्वे सुरू करा.
  • सह्याद्री एक्स्प्रेस बंद असल्याने कोल्हापूर ते पुणे अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करा.
  • कोल्हापूर ते अहमदाबाद एक्स्प्रेसची सेवा आठवड्यातून तीन वेळा द्या.
  • राणी चन्नमा एक्स्प्रेस कोल्हापुरातून पूर्ववत सुरू करा.
  • कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरvaibhavwadiवैभववाडीrailwayरेल्वे