कोल्हापूर : मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती समिती सदस्यांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि निरीक्षणगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.निरीक्षण गृहामध्ये अनाथ मुले तसेच विधि संघर्ष बालक अशी ५० हून अधिक मुले राहतात. शासनाकडून या निरीक्षणगृहातील मुलांना कशा पद्धतीने सुविधा दिल्या जातात याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे एक विशेष पथक बुधवारी कोल्हापुरात आले आहे. यामध्ये कर्नाटक आणि दिल्ली राज्यातील तीन सदस्यांचा समावेश आहे.या सदस्यांनी निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात कशा पद्धतीने दिल्या जातात याची चौकशी केली. तसेच ज्या ठिकाणी विद्यार्थी राहतात त्यांचे लॉकर्स, त्यांची स्वच्छतागृह तपासण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे जेवण बनवले जाते त्या ठिकाणची स्वच्छता आणि तिथे वापरल्या जाणाऱ्यां साहित्यांचा दर्जा तपासण्यात आला. राष्ट्रीय सौरक्षण आयोगाचे हे पथक जिल्ह्यात तीन दिवस असून आठ ठिकाणी तपासणी करणार आहे.
निरीक्षक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी पाहणी केली आहे. त्यांनी आम्हाला भेटीदरम्यान बोलवले पाहिजे होते. आमचेशी चर्चा केली पाहिजी होती. परंतू त्यांनी कोणताही निरोप दिला नाही. संस्थेला शासनाकडून लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी आमची मागणी आहे.पद्मजा तिवले, मानद सचिव, निरीक्षण गृह