शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अध्यक्षपदासाठी सुशांत शेलार यांची खेळी : मेघराजराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 7:25 PM

cinema, chitrpatmahamandal, kolhapurnews अभिनेते सुशांत शेलार यांनी अध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात अविश्वास ठरावाची खेळी खेळली. मात्र असा ठराव करण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेतच नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ मला खाली खेचण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घेतली गेली, असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी शुक्रवारी केला.

ठळक मुद्देअध्यक्षपदासाठी सुशांत शेलार यांची खेळी : मेघराजराजे भोसले अविश्वासची तरतूद नाही

कोल्हापूर : अभिनेते सुशांत शेलार यांनी अध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात अविश्वास ठरावाची खेळी खेळली. मात्र असा ठराव करण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेतच नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ मला खाली खेचण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घेतली गेली, असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी शुक्रवारी केला.

माजी अध्यक्ष भोसले यांनी अविश्वास ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार असे जाहीर केल्याने आठ संचालकांनी शुक्रवारी कॅव्हेट दाखल केले.भोसले यांनी निवेदनाद्वारे भूमिका मांडली. आजपर्यंत सगळ्याच ठरावांना सर्वानुमते मंजुरी असताना मी कोणता मनमानी कारभार केला, महाकलामंडलबाबत सर्वांना ग्रुपवर विचारण्यात आले, त्यावेळी काहींनी सकारात्मक निर्णय दिला; तर काहीजण गप्प बसले.

मग चित्रपट महामंडळ कलामंडलच्या दावणीला बांधले गेले, हा आरोप कशाच्या जोरावर करण्यात आला? राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी सगळ्याच संचालकांनी माझ्या नावाने बहुमताने ठराव केला. मग आत्ताच त्याचा कांगावा का केला जात आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावाची तरतूद नाही, नैसर्गिक न्यायाने हा हक्क मान्य केला तरी अध्यक्षांना किमान सात दिवस आधी नोटीस देणे गरजेचे आहे.

यमकर यांनी स्वत: बँकेत भरलेला धनादेश, बाळा जाधव यांचे धोक्यात आलेले संचालकपद, सतीश रणदिवे व सतीश बिडकर हे मागील कार्यकारिणीच्या १० लाख ७८ हजार रुपयांच्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. वर्षा उसगावकर, निकिता मोघे यांचा जादा भत्त्याचा विषय ऐरणीवर आल्याने स्वार्थ सांभाळण्यासाठीच सगळे एकत्र आल्याची टीका राजेभोसले यांनी केली. 

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर