चंदगड : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील ‘एव्हीएच’ हा मानवी आरोग्य व पर्यावरणाला घातक असलेला प्रकल्प कायमचा बंद करावा, यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी डॉ. बाभूळकर यांनी एव्हीएच प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. जनतेच्या आरोग्यास घातक असलेला हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी जनतेने तीव्र लढा उभा केला आहे. यासाठी मंगळवारी चंदगड तालुका कडकडीत बंद केला होता. प्रकल्पाविरोधात जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या १९ नोव्हेंबर २०१३ च्या अहवालातील १६ त्रुटींचा प्रथम विचार व्हावा. केंद्रीय नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीतर्फे प्रकल्पाची तपासणी व जनसुनावणी व्हावी व तोपर्यंत उत्पादनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. एव्हीएचप्रश्नी तातडीने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहितीही यावेळी डॉ. बाभूळकर यांनी दिली.यावेळी रामराजे कुपेकर, माजी आमदार विनायक मेटे उपस्थित होते.
जनसुनावणीपर्यंत ‘एव्हीएच’ला स्थगिती द्या
By admin | Published: February 11, 2015 11:40 PM