शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

१ कोटी लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 5:47 PM

शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती.

कोल्हापूर : १ कोटी लाचेची मागणी करणाऱ्या निलंबित पोलीस नाईक जॉन विलास तिवडेला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. याच तिवडेवर सप्टेंबर २०२० मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. कुपवाड पोलिसांनी कर्नाटक सीमेवर त्याच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यामध्ये तो न्यायालयीन कोठडीत होता.शाहुपुरी पोलिसांनी त्याला लाच प्रकरणातील गुन्ह्यात कळंबा कारागृहातून आज, ताब्यात घेतले. तिवडेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.नेमकं प्रकरण असे -  तक्रारदाराचे शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी तुमच्या विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील तयारी करा असे सांगत तिवडे यांने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि.२२ मार्च २०२२ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी