शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

अतिक्रमणविरोधी मोहिमेला तूर्त स्थगिती

By admin | Published: May 28, 2014 12:53 AM

हायकोर्टाचा आदेश : महापालिकेने कारवाई थांबविली

 कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम आज, मंगळवारी उच्च न्यायालयाच्या ‘जैसे थे’ ठेवण्याच्या आदेशाने तूर्त स्थगित करण्यात आली. वादग्रस्त व बहुचर्चित ठरलेल्या या अतिक्रमण मोहिमेचा फैसला १६ जून रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांत महापालिकेने २७ हून अधिक इमारती जमीनदोस्त केल्या. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व ना विकास क्षेत्र, या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. गेले अनेक दिवस बांधकामे पाडण्याची रेंगाळलेली मोहीम महापालिकेने अखेर काल, सोमवारपासून हाती घेतली. काल दिवसभरात ११ इमारतींच्या दर्शनी बाजू व संरक्षक भिंती पाडून २४ मीटर रस्त्याची आखणी केली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज पुन्हा अधिक जोमाने कारवाई सुरू केली. दरम्यान, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. सोनक यांनी व्यापार्‍यांची अतिक्रमण कारवाई थांबविण्याची याचिका दाखल करून घेतली. महापालिकेने १६ जूनपर्यंत कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याची सूचना केली. यामुळे दुपारी दोननंतर महापालिकेने कारवाई तूर्त थांबवली.