कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी केलेल्या अन्यायकारक, मनमानी व दिशाभूल करणाऱ्या खुलाशाच्या पत्रकाची होळी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)तर्फे सोमवारी करण्यात आली. डॉ. साळी यांनी प्रलंबित मागण्या सोडविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर ‘सुटा’ने बेमुदत उपोषण व पुढील आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित केले आहे, अशी माहिती ‘सुटा’चे उपाध्यक्ष प्रा. आर. डी. ढमकले यांनी दिली.प्रलंबित मागण्यांबाबत ‘सुटा’ने सहसंचालक डॉ. साळी यांच्याबरोबर चर्चा केली, निवेदने दिली, पण त्यांच्या कारभारात सुधारणा झाली नाही. या मनमानीविरुद्ध ‘सुटा’ने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुुरू केले होते. दुपारी चारच्या सुमारास शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सहसंचालकांच्या खुलाशाच्या पत्रकाची होळी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एच. पाटील, उपाध्यक्ष आर. डी. ढमकले, एस. एम. पवार, यू. एम. वाघमारे, प्रकाश कुंभार, बी. बी. जाधव, आर. जी. कोरबू, आदी सहभागी झाले होते.
आश्वासनानंतर ‘सुटा’चे आंदोलन स्थगित
By admin | Published: August 23, 2016 12:25 AM