शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

‘बहुजन परिवर्तन’कडून हिंसक आंदोलनाचा संशय

By admin | Published: February 05, 2015 12:28 AM

पोलीस प्रशासनास पत्र : जिल्हा प्रशासन सतर्क; आंदोलनस्थळी बंदोबस्तात वाढ

कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहत व सायबर येथील डवरी वसाहतीतील राखीव जागा अतिक्रमण काढून ताब्यात द्यावी, यासाठी बहुजन परिवर्तन पार्टीप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार आहे; परंतु आंदोलकांचा प्रतिसाद नाही. याउलट चर्चेकडे दुर्लक्ष करून आंदोलन हिंसक करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आला आहे, तशी माहिती पोलीस प्रशासनासही देण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी बुधवारी बंदोबस्त वाढविण्यात आला.सायबर कॉलेज येथील यशवंत गृहनिर्माण संस्थेच्या कथित वादग्रस्त जागेवर अतिक्रमण झाले आहे. लक्षतीर्थ वसाहतीत मागासलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहांसाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याने डवरी समाज मुलांबाळांना घेऊन उपोषणास बसला आहे. जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही, तर आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन आंदोलकांशी चर्चेसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, आंदोलकांनी, चर्चेसाठी आम्ही येणार नाही, अधिकाऱ्यांनीच आंदोलनस्थळी यावे असा आग्रह धरला आहे. कितीही तीव्र आंदोलन केले तरी चर्चेतूनच मार्ग काढावा लागणार आह, असे असताना आडमुठेपणाने चर्चेसाठी आम्ही येणारच नाही, जागा ताब्यात द्या, अशा भूमिकेवर ठाम राहणे कितपत योग्य, अशी विचारणा प्रशासाकडून होत आहे. हिंसक वळण लावण्याचा डाव असल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आला आहे. वादग्रस्त जागेवर सहा कुटुंबांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत, असा आरोप आहे. जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. परिणामी यातून मार्ग काढण्यासंबंधी प्रशासनाचीही कोंडी झाली आहे. जागा ताब्यात घेऊन अतिक्रमण केलेल्यांवर फौजदारी करावी, अशीही मागणी असल्याने जिल्हा प्रशासनावर मर्यादा येत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून ही जागा रिकामी करुन देतो अशी कांहीजणांनी संस्थेकडून सुपारीच घेतली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.