शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

Swabimani Shetkari Sanghatna- उंब्रजमध्ये स्वाभिमानीने राज्य मार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 3:36 PM

Swabimani Shetkari Sanghatna Satara-वीज बिले माफ करून सुरू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उंब्रज परिसरातील ग्राहकांशी अरेरावी करू नये, अशी समज दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी व नागरिकांची वीज बिले आघाडी सरकारने तत्काळ माफ करावीत, अशी मागणी केली.

ठळक मुद्दे वीज बिले माफ करण्याची मागणी अधिकाऱ्यांना निवेदन, घोषणांनी परिसर दणाणला

उंब्रज : वीज बिले माफ करून सुरू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उंब्रज परिसरातील ग्राहकांशी अरेरावी करू नये, अशी समज दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी व नागरिकांची वीज बिले आघाडी सरकारने तत्काळ माफ करावीत, अशी मागणी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केली. त्यानंतर वीज वितरण विरोधात घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, विक्रमसिंह कदम, इंद्रजीत जाधव, सुरेश पाटील, वसंत पाटील, शरद जाधव, महेश जाधव, दत्ता थोरात, अभिजित जाधव दिग्विजय कदम व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनकर्त्यांनी मोर्चास सुरुवात केली. चौकातून वीज वितरण कार्यालयापर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाटण पंढरपूर राज्य मार्ग काहीकाळ रोखला. दरम्यान आंदोलकांनी वीज वितरणचे अभियंता कुंभार यांना निवेदन दिले. वीज बिल माफ करून सक्तीची वसुली थांबवावी, ज्यांची वीज कपात केली आहे ती त्वरित जोडून द्यावीत, वीजबिलात संपूर्ण माफी मिळावी, लॉकडाऊन कालावधीत दिलेली अंदाजे वीज बिले मागे घ्यावीत, अशी मागणी केली.यावेळी दादासाहेब यादव म्हणाले, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाराष्ट्रातील जनतेने वीज बिल माफीसाठी सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत. लोकांना वीज बिले दिली गेली नाहीत तसेच ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याबाबत सूतोवाच केले. परंतु सरकारने पलटी मारून सक्तीची वसुली सुरू केली आहे. वीज कनेक्शन तोडणे चालू केले आहे.वस्तुतः बऱ्याच सरकारने वीज बिलात ५० टक्के पर्यंत सूट दिलेली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने कोणतीही माफी दिलेली नाही. उलट अंदाजित व चुकीची वीजबिले लोकांना दिल्याने त्याचा नाहक त्रास होत आहे. कृषिपंपाच्या वीज बिलाबाबत ५०टक्के माफी केली, परंतु मध्यंतरी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केलेले आहेत.देवानंद पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या अन्याय कारक वीज बिल वसुलीच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात वादळ, पाऊस, गारपीट,पूरपरिस्थिती, पिकांवर येणारी रोगराई व कीड,आणि त्यातून मिळणारा हमीभाव याचा मेळ घालताना सर्व सामान्य शेतकरी हवालदिल झालेला आहे.

कोरोना या रोगाचे जागतिक संकट आले,त्या संकटाचा सामना करताना त्यातून शेतकरी राजा सुटला नाही. त्याचा भाजीपाला व इतर माल कवडी मोलाने विकावा लागला. त्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. काळ्या आईची सेवा करत कष्ट करीत राहिला या शेतकऱ्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज बिल माफ करावे, अशी मागणी केलेली आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज बाजारपेठ व महावितरण कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसर