कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागन्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पद यात्रेला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्यातील प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून नदीच्या संगमापासून पदयात्रेला सुरुवात झाली. 5 सप्टेंबर रोजी ही पदयात्रा शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे पोहोचणार आहे. त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सुद्धा शेट्टी यांनी दिला. (Swabhimani Shetkari Sanghatana's march begins in Kolhapur; these are demands)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शासनाकडे मागण्या : 1)2019 च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा आणि पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे विनाअट पुनर्वसन करा.2) कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुला जवळचा भराव कमी करून तातडीने कमानी पूल बांधा.3) पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट फी तसेच शैक्षणिक कर्जमाफी करा.4) 2005 ते 2019 पर्यंत आलेल्या महापुरात झालेल्या नुकनासभरपाईची उपाययोजना करावी.5) महापुरामुळे शेतकरी व्यापारी उद्योग धंदे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी वाहून गेल्या असून विहिरी खचलेल्या आहेत.तसेच यंत्रमागधारकांनाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. या सर्वांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. 6)महापुराचे पाणी ज्या गावात गेले आहे, त्या संपूर्ण गावाला पूरग्रस्त गाव म्हणून घोषित करून सरसकट सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे.7) सामायिक खातेदार असणाऱ्या कर्जदारांचे पंचनामे होत नसल्याने कर्ज खाते ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी. 8)ज्या शेतकऱ्यांनी कृषी विमा उतरवलेला आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई म्हणून विम्याची संपूर्ण रक्कम देण्याचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत.