शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Kolhapur: स्वामी समर्थ केंद्राचा ध्यास..पंचवीस हजार रुग्णांना भरवला घास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 1:59 PM

जयसिंगपूरमधील मानवसेवा : महिला, सेवेकरी यांचा उत्स्फूर्त पुढाकार

संदीप बावचेजयसिंगपूर (कोल्हापूर) : अन्नदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेतून येथील स्वामी समर्थ केंद्राकडून रुग्णांना मोफत जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शहरातील सर्व रुग्णालयांतील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हे प्रेमाचे दोन घास दिले जात आहेत. गेल्या तीन महिन्यांत २५ हजारजणांना या सेवेचा लाभ झाला आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह (सीपीआर) अनेक शहरांत असा उपक्रम सुरू होण्याची गरज आहे.येथील गल्ली क्रमांक पाचमधील स्वामी समर्थ केंद्र अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवते. त्यांना रुग्ण व त्याच्या सेवेसाठीच्या लोकांची जेवणासाठी आबाळ होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी केंद्रातर्फे त्यांना डबे पुरवण्याचा निर्णय घेतला. शहरात २० हून अधिक खासगी रुग्णालय व एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. उपचार घेण्यासाठी कर्नाटक सीमाभाग, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील रुग्ण येतात. मात्र, घरी जाऊन डबा घेऊन येणे अशक्य असते.त्यांना १५ जूनपासून डबे सुरू करण्यात आले. त्यामुळे परगावाहून आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना गावाकडे जाऊन जेवणाचे डबे आणण्यासाठी धावाधाव करावी लागत नाही. त्यांचा आर्थिक खर्चही होत नाही. संकटाच्या काळात 'स्वामी'च आमच्यासाठी धावून येतात आणि अन्न पुरवितात, अशी रुग्णांची भावना बनली आहे.

स्वयंसेवकांकडून सामाजिक बांधीलकीडबा पोहोच करण्यासाठी सध्या तरुण कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. स्वामींचा विचार लोकांच्या मुखात घास गेला पाहिजे, या भावनेतून डबे पोहोच करण्यासाठी तरुणांची साखळी निर्माण होत आहे. शहरात वेगवेगळी तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, महिला मंडळे आहेत. या सर्वांनी ठरविले तर नक्कीच हा उपक्रम दीर्घकाळ चालू शकतो. ही सेवा सुलभ व्हावी म्हणून एका व्यक्तीने इलेक्ट्रिक गाडीही उपलब्ध करून दिली आहे.

सेवा कशी चालते..सर्व रुग्णालयात अन्नछत्र केंद्राच्या टोल फ्री क्रमांकाच्या पाट्या लावल्या आहेत. त्यावर फोन केला की, रोज दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी साडेसात वाजता दवाखान्यात डबा पोहोच केला जातो.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून समाजाच्या मदतीतूनच हा उपक्रम सुरू आहे. त्यास समाजाचे पाठबळ मोठे आहे. -वैजनाथ राऊत, सेवेकरी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल