आजरा :
येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात २ कोटी १६ लाखांचा ढोबळ नफा झाला असून, संस्थेने एकूण २२७ कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी दिली.
आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये ३० कोटी ४६ लाखांची वाढ झाली असून, त्या १२९ कोटी १४ लाख ५२ हजार ९६६ इतक्या झाल्या आहेत. वसूल भागभांडवल ३ कोटी १० लाखांचे असून, कर्ज वाटपात २६ कोटीपेक्षा अधिक वाढवून ९८ कोटीने कर्ज वितरण केले आहे.
संस्थेने ४३ कोटी २८ लाखांची गुंतवणूक केली असून, सी.डी. रेशो ७० टक्के इतका आहे. संस्थेकडे १३४ कोटीहून अधिक खेळते भांडवल आहे.
संस्थेने मुख्य कार्यालय व ९ शाखेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला आहे. काजू व्यावसायिक व उद्योगांना त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली आहे. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाइन वीज, फोन व मोबाइल बिल भरणा, डीटीएच रिचार्ज, सर्व प्रकारची वीमा पॉलिसी उतरण्याची सोय, भारतातील प्रमुख शहरांमध्ये डीडी काढण्याची सुविधा, सोने तारण कर्जाची सुविधा, सर्व शाखांमधून मनी ट्रान्सफरची सोय, सभासदांचा अपघात विमा उतरणे यांसह सर्व शाखा संगणकीकृत आहेत.
यावेळी उपाध्यक्ष दयानंद भुसारी, संचालक नारायण सावंत, मलिककुमार बुरुड, रवींद्र दामले, रामचंद्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, संजय घंटे, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, व्यवस्थापक अर्जून कुंभार आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------
* जनार्दन टोपले : १५०४२०२१-गड-०५