कोल्हापूर : देशभर स्वच्छता मोहिमेचा जागर सुरू आहे. वाढत्या साथींचे आजार आणि रोगराईपासून मुक्तता होण्यासाठी परिसर स्वच्छता गरजेची आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र, सुस्तच आहे. कोल्हापुरात स्वाईन फ्लूचा धोका वाढत असताना नागरिकांनी तक्रार करूनही विचारेमाळ येथील सांडपाण्याची डबकी बुजविण्याची तसदी मनपा प्रशासन घेत नाही. त्यामुळे साथींच्या आजारांना विशेषत: स्वाईन फ्लूला निमंत्रण मिळत आहे, अशी तक्रार येथील पत्रकार नगरमधील रहिवासी रणजित भोसले यांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनवर दिली.विचारेमाळ परिसरातील पत्रकार नगरातील ए, बी, सी, अशा तीन ओळीत घरांची रचना आहे. बी व सी या ओळीतील घरांचे सांडपाणी येथील रिकाम्या फ्लॅटमध्येच साचून राहते. परिणामी पत्रकार नगरात डबक्यांचे साम्राज्य झाले आहे. या डबक्यात गावठी डुकरांचे कायम वास्तव्य असते. या भागात डुकरांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. अशा परिस्थितीत स्वाईन फ्लूसारख्या आजाराचा धोका परिसरातील नागरिकांना होण्याची शक्यता आहे, याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही आरोग्य विभाग सुन्नच आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात डासांचा प्रभावही वाढला आहे. त्यामुळे पत्रकार नगर व स्वातंत्र्यसैनिक हौसिंग सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात स्वच्छता मोहीम राबवून याचा कायमचा बंदोबस्ेत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
पत्रक ारनगरात स्वाईन फ्लूला निमंत्रण
By admin | Published: February 27, 2015 11:09 PM