कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढले असून यामध्ये १३ जणांचा बळी गेला आहे. सध्या ९ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, १६ जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकूण ११३ जणांना या आजाराची लागण झाली आहे.गेल्या दोन महिन्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. काेरोनानंतर एकूणच सर्दी, ताप, खोकला सुरू झाल्यानंतर नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असताना अनेकदा ताप अंगावर काढण्याची वृत्ती वाढत आहे. थोडा ताप कमी आला की गोळ्या बंद केल्या जातात. मग पुन्हा ताप येतो. पुन्हा चाचण्या केल्या जातात. अशातच जुना काही आजार असेल तर आरोग्यस्थिती आणखी बिघडते. त्यामुळेच स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत जिल्ह्यात वाढ होत आहे.सध्या ४४ जणांवर उपचारसध्या कोल्हापूर जिल्ह्यात ४४ जण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ७० पुरुष आणि ४४ महिलांचा समावेश आहे. ३१ ते ७० वयोगटातील रुग्णांची संख्या यामध्ये अधिक असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळेच ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून १८ जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.वयोगटानुसार रुग्णसंख्या१ ते १० - ०५११ ते २० - ०४२१ ते ३० - १३३१ ते ४० - २२४१ ते ५० - १२५१ ते ६० - २९६१ ते ७० - २३७१ ते ८० - ०५८१ ते ९० - ०१एकूण ११४
जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले असून त्यामुळे स्वाईन फ्लूचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी अंगावर ताप काढू नये. ताप कमी आला म्हणून डोस बंद करू नये. तो पूर्ण करावा. वैद्यकीय सल्ला घ्यावा. ताप आल्यास शक्यतो इतरांशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा. - डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर