शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्वाइनचा फैलाव वेगात

By admin | Published: September 18, 2015 11:54 PM

जिल्ह्याला विळखा : गणेशोत्सव काळात दक्षतेचे आवाहन; आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : थंड आणि दमट वातावरणामुळे जिल्ह्याला स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत असून सध्या जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दिवसाला सुमारे ८०० जणांची तपासणी केली जात आहे. जानेवारीपासून ‘स्वाइन’चे २७४ संशयित रुग्ण आढळून आले. यापैकी १३३ पॉझिटिव्ह रुग्णांमधील ३२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांत २४ रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत. यातील १४ जण पॉझिटिव्ह असून, दहाजण संशयित आहेत. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांत सर्दी, पडसे, ताप, आदी स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ७०० ते ८०० जणांची तपासणी केली जात आहे. गरोदर महिला, रोगप्रतिकार शक्ती कमी झालेले व ६५ वर्षांवरील व्यक्ती आणि पाच वर्षांखालील मुले, अशा तीन गटांच्या माध्यमातून स्वाइनबाबत तपासणी व उपचार होत आहेत. सध्या थंडी आणि दमट असे वातावरण आहे. ते स्वाइनच्या वाढीला पोषक आहे. गर्दीमुळे यात अधिक भर पडते. त्यादृष्टीने गणेशोत्सवाच्या कालावधीत स्वाइनच्या रुग्णांची मोठी वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. आता स्वाइनला पोषक वातावरण असल्याने गर्दीत जाणे, तसेच आजारी असल्यास बाहेर फिरणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, स्वाइनला प्रतिबंध करणारी टॅमिफ्लू सायरप, गोळ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सीपीआरमधील स्वाइन फ्लू कक्षाचे आरोग्य सहायक एन. बी. भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्थायी सभेतही ‘स्वाइन’ रोखण्याबाबत चर्चा --कोल्हापूर : शहरात स्वाइन फ्लूची साथ पसरू नये म्हणून उपायांबरोबरच प्रतिबंधाबाबतही व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत देण्यात आली. गणेशोत्सव सुरू असल्याने शहरात दिवसातून दोन वेळा कचरा उठाव करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव पाटील होते. स्वाइन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाय व या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी काय नियोजन केले आहे, स्वाइन फ्लूमुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली आहे का, तसेच गणेशोत्सव काळात स्वच्छतेचे काय नियोजन केले याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी शारंगधर देशमुख यांनी सभेत केली होती. त्यावर माहिती देताना प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, स्वाइन फ्लूसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाय व जनजागृती करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी डिजिटल बॅनर तयार करून त्यांचे वितरण करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती व गर्दीच्या ठिकाणी तसेच केएमटी बसेसमध्ये ही बॅनर्स लावली गेली आहेत. घरोघरी पत्रके वाटली जात आहेत. फुलेवाडी येथील नगरोत्थानच्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्ताअभावी काढता आलेले नाही. बंदोबस्त मिळताच त्यावर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. सभापती पाटील यांनीच या विषयाकडे लक्ष वेधले. ‘नगरोत्थान’चा रस्ताही तातडीने हाती घ्या, अशी सूचना पाटील यांनी केली. जयश्री साबळे यांनी राजेंद्रनगरात चॅनेल सफाईला कर्मचारी मिळत नसल्याची तक्रार केली, तेव्हा ‘हबक’ पद्धतीने कामे सुरू असल्याने कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. तथापि, ही सफाई लवकरच केली जाईल, असे सांगण्यात आले.सर्वाधिक रुग्ण कागल तालुक्यातस्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण कागल तालुक्यात आहेत. दळणवळणाची सुविधा चांगली असल्याने पुणे, मुंंबई, बेळगाव, बंगलोर, आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्यांमध्ये कागल तालुक्यातील लोकांची संख्या अधिक आहे. हा आजार संसर्गजन्य आहे. सध्या गणेशोत्सवाचा कालावधी आहे. त्यामुळे या आजाराबद्दल प्रत्येकाने सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. प्रमुख लक्षणे...सौम्य ताप (३८ अंश सेल्सिग्रेडपेक्षा कमी), खोकला, घसा खवखवणे, अंग व डोके दुखणे, उलटी, जुलाब, श्वासोच्छ्वासाचा त्रास, छातीत दुखणे, थुंकीद्वारे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे नीळसर पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढणे, गुंगी येणे.महत्त्वाची खबरदारी४स्वाइन फ्लूसदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण४शाळा, आश्रमशाळा, मदरसे, अंगणवाड्या यांचे सर्वेक्षण४गरोदर मातांचे सर्वेक्षण४औषधांची उपलब्धता करणे४ व्यापक जनजागृतीऔषधसाठा असा...जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालयात १८०० फेसमास्क आहेत. टॅमिफ्लूचा औषधसाठा करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही आवश्यकतेनुसार औषधांचा पुरवठा केला जात आहे. दमट वातावरणामुळे सध्या स्वाइनचा प्रादुर्भाव वाढत आहे. गणेशोत्सवात त्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती आजारी आहेत, त्यांनी प्रकृती ठीक होईपर्यंत बाहेर पडू नये. प्रत्येकाने स्वाइनपासून दूर राहण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे.- डॉ. गिरीष पाटील,स्वाइन फ्लू कक्ष, सीपीआर रुग्णालयसेवा रुग्णालयात आतापर्यंत ५० रुग्णांची तपासणी आणि पाच रुग्णांवर उपचार केले आहेत. सध्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हृदयरोग, किडनी, श्वसन, आदी विकारांच्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यांना स्वाइनची लागण होण्याची अधिक शक्यता असते. त्यांनी योग्य आहार आणि वेळेत औषधोपचार घेणे आवश्यक आहे. गरोदर महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस लवकरच उपलब्ध होणार आहे.- डॉ. एल. एस. पाटील,वैद्यकीय अधीक्षक,सेवा रुग्णालय, लाईन बाजार.