शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

फायनान्सच्या कर्जदारांवर पुन्हा दंडाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 3:17 PM

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबँका बंद असल्याचा फटका, एटीएम सेंटरवर पैसे जमा करावे लागणारसहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला लागणार कात्री

विनोद सावंत कोल्हापूर : कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना कहर सुरू आहे. रोज दोनशेच्यावर नव्याने रुग्णांत भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २० ते २६ जुलै कडक लॉकडाऊन केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये बँका सुरू होत्या. परंतु बँकेतील कर्मचारी कोरोनाबाधित सापडत आहेत. तसेच ग्राहकांची बंद दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बँकेत गर्दी होते.

या पार्श्वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने सात दिवस बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे, अशांना फटका बसत आहे. काहींकडून सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेमधून फायनान्सचे हप्ते ईसीएसच्या (इलेक्ट्रिक क्लिअरन्स सर्व्हिस) माध्यमातून जमा केले जातात.

कर्जाच्या तारखेच्या अगोदर एक दिवस खात्यावर पैशाची तजवीज केली जाते. मात्र, सध्या बँका बंद असल्याने अनेकांना पैसे जमा करता आले नाहीत. अशा बहुतांशी कर्जदारांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे.सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्जदारांना दिलासा२० ते २६ जुलै दरम्यान ज्यांचे कर्जाचे ईएमआय हप्ते आहेत, त्या तारखेला भरणे बंधनकारक आहे. अन्यथा कर्जानुसार दंड लावला जातो. सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकेतही वाहन तारण, गृहतारण, घरबांधणी, घर दुरुस्ती असे कर्ज वाटप केले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकने 30 ऑगस्टपर्यंत अशाप्रकारे दंड वसूल करू नये, असे आदेश या बँकांना दिले आहेत.हे पर्याय....

  • तत्काळ फायनान्स कंपनीला मेल करून ईसीएस न करण्याची सूचना करणे
  • संबंधित खात्यावर ऑनलाईनने पैसे जमा करणे
  • कर्ज हप्ता वर्ग होत असलेल्या बँकेच्या एटीएम सेंटरवर जाऊन जमा मशीनच्या साहाय्याने हप्त्याएवढे पैसे जमा करणे

बँका बंद असल्या तरी एटीएम सेंटर सुरू आहेत. याठिकाणी खात्यावर पैसे जमा करण्याची सुविधा आहे. फायनान्स कंपनीला धनादेश अथवा ईसीएस केला असेल. त्यांनी सेंटरवर जाऊन पैसे जमा करणे योग्य ठरणार आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार सहकारी बँकेतील कर्जदारांना दंड लागणार नाही.सत्यजित जगदाळे,बँक अधिकारी

दुहेरी दंडखात्यावर बॅलन्स न ठेवल्यामुळे संबंधित बँका किमान शंभर रुपये दंड आकारणार आहेत. तसेच फायनान्स कंपनीही हप्ता तारखेला जमा केला नसल्यामुळे पाचशे ते हजार रुपये दंड वसूल करणार आहे. मागील लॉकडाऊननंतर कर्जदार फायनान्स कंपनी यांच्यामध्ये यावरून वादाचे प्रसंग घडले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर