गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असून, चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी अडसूळ यांनी सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. संवेदनशील गावांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण ११५ मतदान केंद्रे असून, ७ क्षेत्रीय अधिकारी, ११५ मतदान अधिकारी, ३४८ केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी, ११५ पोलीस कर्मचारी, होमगार्ड, टास्कफोर्स अशी सुसज्ज यंत्रणा लावण्यात आली आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती अशा : आंबवणे, आदमापूर, एरंडपे-खेडगे, कलनाकवाडी, खानापूर, गंगापूर, डेळे-चिवाळे, तांब्याचीवाडी, दोनवडे, नवरसवाडी, नवले, नांगरगाव, नांदोली-करंबळी, नागणवाडी, नाधवडे, नितवडे, पंडिवरे, पळशिवणे, पांगिरे, पाळ्याचाहुडा, फणसवाडी, बसरेवाडी, बामणे, बारवे, बिद्री-पेठशिवापूर, बेगवडे, बेडीव, भालेकरवाडी-थड्याचीवाडी, भेंडवडे, मठगाव-मानी, ममदापूर, मिणचे खुर्द,, मेघोली, मोरेवाडी, म्हसवे, म्हासरंग-उकीरभाटले, लोटेवाडी, शिवडाव, सालपेवाडी, सोनुर्ली, हेळेवाडी.
भुदरगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:21 AM