तसे निवेदन चंदगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून, अंकुश कांबळे, दिलीप कांबळे, मयूर कांबळे व दशरथ कांबळे यांनी घडल्या प्रकारची गंभीरपणे दाखल घ्यावी, अशी विनंती केली आहे. याबाबत निवेदनातून मिळणारी माहिती अशी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, शैक्षणिक संस्था आदी कार्यालयांत देवदेवतांचे पूजन करणे, फोटो लावणे हे वास्तविक भारतीय राज्यघटनेच्या कलम २८(१), २८(३) नुसार चुकीचे आहे. या नियमास अनुसरून भारतीय संविधानाचे व न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, असा प्रकार करंजगाव ग्रामपंचायतीमध्ये घडल्याचे ग्रामस्थांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने खळबळ उडाली आहे. एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी व इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठीच सदरचा प्रकार ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. थेट अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली असल्याने तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
करंजगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:27 AM