कागल : भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे राजर्षी शाहुंच्या विचारांच्या विपरीत कृती करीत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या तारखेवरून संभ्रम तयार करून जातीय तेढ निर्माण करीत आहेत. ऐतिहासिक राम मंदिरात राजकीय कार्यक्रम, साहित्य पदार्थ विक्रीचे स्टॉल सुरू करून प्रभु श्रीरामांची विटंबना करीत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी घाटगे यांच्याविरोधात तक्रारही दिली.येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र येत मुख्य मार्गावरून हा मोर्चा कागल पोलीस ठाण्या जवळ आल्यावर तो पोलिसांनी अडविला. प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांची भेट घेऊन तक्रार दिली. जिल्हा बॅकेचे संचालक भैय्या माने प्रकाश गाडेकर, प्रविण काळबर देवानंद पाटील यांची भाषणे झाली. युवराज पाटील, शशिकांत खोत, प्रविण भोसले, मनोज फराकटे, अजित कांबळे बळवंतराव माने संजय फराकटे, अमित पिष्टे पदमजा भालबर आदी मान्यवर उपस्थित होते.मुश्रीफांचा वाढदिवस रामनवमी दिवसी नसल्याचा पुरावाग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन हा वाद उफाळून आला. या जाहिरातीत प्रभु श्रीरामांचा एकेरी उल्लेख झाल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी शुक्रवारी (दि.१५) कागल पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुश्रीफ हे जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांचा वाढदिवस रामनवमी दिवसी नसल्याचा पुरावा देखील दिले आहेत.समरजित घाटगेंचा स्टंटयावरसर्व घडामोडीवर मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते जाहीराती देतात. त्यामुळे समरजित घाटगे माझ्या विरोधात तक्रार दाखल करून फक्त स्टंट करीत आहेत असे म्हणाले होते. कागल ही राजर्षी शाहूची नगरी आहे. अशा जातीयवादी प्रवृत्तीला कागलची जनता योग्य जागा दाखवेल असेही म्हणाले.
समरजित घाटगेंवर कारवाई करा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 1:51 PM