शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करा

By admin | Published: January 15, 2016 11:52 PM

शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन : कायदेशीर सल्ला घेऊन कारवाईचे आदेश : प्रदीप देशपांडे --गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील साक्षीदारांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी देणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कॉ. दिलीप पवार यांच्यासह शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना शुक्रवारी दिले. त्यावर देशपांडे यांनी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना कायदेशीर सल्ला घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे, परंतु अप्रत्यक्षरीत्या या खटल्यातील साक्षीदारांना भीतीने धडकी भरेल, अशा आशयाचे धमकी देणारे पत्र ‘सनातन’च्या वतीने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना पाठविले होते. या पत्राचा संदर्भ घेत पानसरे कुटुंबीयांचे स्नेही व पानसरे विचाराचा पाठीराखा असणारे कॉ. दिलीप पवार यांनी या खटल्यातील सर्वच साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न अ‍ॅड. पुनाळेकर यांनी केला आहे. त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यास पवार यांच्यासह मेघा पानसरे, अ‍ॅड. विवेक घाटगे, प्रकाश मोरे शुक्रवारी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. परंतु, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी गैरहजर असल्याने शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक देशपांडे यांची भेट घेतली. अ‍ॅड. घाटगे यांनी अ‍ॅड. पुनाळेकर हे पश्चिम महाराष्ट्राला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, असे जाहीरपणे वक्तव्य करीत आहेत. पानसरे खटल्यामध्ये कॉ. पवार यांच्यासह ७७ साक्षीदार आहेत. ते सर्व सकाळी फिरायला जातात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या पत्रातील मजकूर व त्यांनी केलेली वक्तव्ये हा पुरावा न्यायालयासमोर ठेवला तर आरोपीला शिक्षा होऊ शकते. आरोपी समीर गायकवाडच्या बाजूने त्याचे आई, भाऊ किंवा नातेवाईक पुढे आले नाहीत. सनातन आली आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. या खटल्यातील प्रत्येक साक्षीदाराला आपल्या रोजच्या दिनचर्याची माहिती हे लोक घेत असतील अशी भीती मनामध्ये आहे. त्यामुळे कॉ. पुनाळेकर यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात कॉ. पवार यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यावर पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर चिंताजनक वाटतो, याची जाणीव पोलिसांना आहे. पोलीस महासंचालकांनीदेखील यासंदर्भात दखल घेत आम्हाला मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. आपल्या अर्जासंदर्भात शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व शाहूपुरीचे निरीक्षक अरविंद चौधरी यांच्याशी चर्चा करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश देऊ, अशी ग्वाही यावेळी दिली. त्यानंतर देशपांडे यांनी दोघाही अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)शाहूपुरीचे निरीक्षक गैरहजरपानसरे खटल्यासंदर्भात साक्षीदारांना धमकी देणाऱ्या अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या विरोधात शुक्रवारी फिर्याद देण्यास शिष्टमंडळ येणार आहे, अशी पूर्वकल्पना शुक्रवारी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना दिली होती. परंतु, ते आज मुद्दाम गैरहजर राहिल्याची तक्रार अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.