शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जीवनदायी’त अपहार करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Published: June 06, 2015 12:20 AM

शिवसेनेकडून जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर : इन कॅमेरा शस्त्रक्रिया करण्याची मागणी; वरिष्ठांना अहवाल पाठवण्याचे आश्वासन--लोकमतचा पाठपुरावा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये ज्या रुग्णालयांनी अपहार, गैरव्यवहार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच यापुढे सर्व शस्त्रक्रिया या ‘इन कॅमेरा’ कराव्यात, अशी मागणी शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर व जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरसूळकर व देठे यांना धारेवर धरले.केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये सध्या जिल्ह्यातील ३१ रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेमधील काही रुग्णालये, तेथील डॉक्टर रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करत आहेत. यामध्ये विशेषत: हृदयशस्त्रक्रियेच्या बाबतीत अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाइकांना परदेशी बनावटीची ‘स्प्रिंग’ बसविण्यासाठी भाग पाडून त्यांच्याकडून पॅकेजपेक्षा ५० हजार ते दीड लाखांपर्यंतची जास्तीची रक्कम घेऊन आर्थिक गंडा घातला जातो. यासाठी या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांच्या डॉक्टरांची बैठक घ्यावी. त्याचबरोबर डॉक्टरांच्या ओळखीचा फायदा घेऊन काही धनदांडगे रुग्णसुद्धा खोटी कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ उठवत आहेत.डॉ. बी. डी. आरसूळकर व डॉ. अशोक देठे यांनी राजीव गांधी जीवनदायीमधील रुग्णालयांचा अहवाल वरिष्ठांना पाठवू व त्यानंतर कारवाई करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात रवी चौगुले, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, तानाजी आंग्रे, राजू यादव, राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, उदय सुतार, शशिकांत बिडकर, दिलीप देसाई, पप्पू नाईक, योगेंद्र माने, दीपाली शिंदे, कमल पाटील, सुजाता सोहनी, रणजित आयरेकर, प्रवीण पालव, आदींचा सहभाग होता. पैसे मागितल्यास संपर्काचे आवाहनज्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा या योजनेच्या लाभार्थी रुग्णांकडून नियमबाह्य अन्य पैशांची मागणी केल्यास पद्मा टॉकीज येथील जिल्हा शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केले.