शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अवैध धार्मिक स्थळांवरील कारवाई तीन टप्प्यांत

By admin | Published: May 01, 2016 12:57 AM

नोव्हेंबरअखेर अंमलबजावणी : महिनाअखेरीस नियमितीकरणावर निर्णय

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तीन टप्पे तयार केले असून, पहिल्या टप्प्यात ३१७ पैकी १८० धार्मिक स्थळे नियमित केली जाण्याची शक्यता आहे, तर उर्वरित १३७ धार्मिक स्थळांचे स्थलांतर किंवा जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. ही कारवाई नोव्हेंबरअखेर पूर्ण करायची आहे.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून त्याची यादी वृत्तपत्रातून जाहीर केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबत न्यायालयाने मुदत दिली आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती मागवून सुनावणीही घेतली होती. मनपा विभागीय कार्यालयाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ३१७ धार्मिक स्थळे ही अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले; परंतु सर्वच धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकाकडून हरकती घेतल्या होत्या. ती पाडू नयेत, ही बांधकामे नियमित करावीत, अशी मागणी सुनावणीवेळी केली आहे. ही सुनावणी पूर्ण झाली आहे. धार्मिक स्थळांबाबतच्या हरकती, त्यावरील सुनावणी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचारात घेता ३१७ पैकी १८० धार्मिक स्थळे ही नियमित होण्यासारखी असल्याचे मनपा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा धार्मिक स्थळांचेही पुन्हा सर्वेक्षण झाले आहे. तशी यादीही तयार केली आहे. ३१ मे पूर्वी ही बांधकामे नियमित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जी धार्मिक स्थळे स्थलांतर करावी लागणार आहेत, त्यावर निर्णय घेऊन ती स्थलांतर केली जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करता येणे अशक्य आहे, शिवाय त्यांना पर्यायी जागेत स्थलांतर करणेही अशक्य आहे, ती बांधकामे पाडण्याची कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. अवैध धार्मिक स्थळांवरील या कारवाईबाबत पोलिस खात्याशीही समन्वय ठेवून पुढील कारवाई करण्याचे निर्णय होतील, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)