कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
शहरातील सांडपाणी बºयाच वेळा पंचगंगा नदीत मिसळत असते, त्यावेळी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य करण्यात येते. पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडतात; परंतु यावेळी झालेल्या नदी प्रदूषणास महानगरपालिका जबाबदार नाही. अन्य काही घटकांनी नदीमध्ये मळी किंवा रसायनेमिश्रित सांडपाणी सोडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर बरेच दिवस साठवून ठेवलेल्या पाण्याला दुर्गंधी येते, तसाही प्रकार झाला असावा, असे सांगण्यात येते.
कारणे काहीही असली तरी शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांतून तसेच नगरसेवकांतून त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी होत होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नदीतील पाण्याची तपासणी केली असता सकृत्दर्शनी पाण्याला वास येत असल्याचे आढळून आले. मात्र हे प्रदूषण कशामुळे झाले याचा शोध मात्र घेता आलेला नाही. म्हणून महापालिकेचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयास पत्र पाठवून प्रदूषण करणाºया घटकांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने भोगावती नदीचे हळदी, बहिरेवाडी, कोगे, शिंगणापूर, आदी ठिकाणी पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रदूषणाचे कारण अस्पष्ट आहे. पाण्यात कोणते घटक मिसळल्याने हे पाणी प्रदूषित झाले हे रासायनिक पृथक्क रणानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पंचगंगा नदी प्रवाहित करणे हा मात्र तातडीचा उपाय असून तो अमलात आणल्यास शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकेल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.