शिरोळ : श्री दत्त साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने कामगारांबरोबरच सामान्य जनतेच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी दत्त कारखान्याच्या परिसरात महा-ई-सेवा सुविधा निर्माण करण्यात आली असून या सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
येथील दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर श्री दत्त शर्करा औद्यागिक श्रमिक संघटनेच्या वतीने ‘श्री दत्त ई-सेवा केंद्रा’चे उद्घाटन शिरोळ तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नायब तहसीलदार पाटील म्हणाले, दत्त साखर कारखान्याने लोकहिताचे निर्णय कायमच घेतले असून नव्याने सुरू झालेल्या महा-ई सेवेचा लाभ सर्वांनाच होणार आहे.
कार्यक्रमास कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, रावसाहेब भोसले, डी. जे. दबडे, संजय संकपाळ, विश्वजीत शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बनगे यांनी केले. सूत्रसंचालन शेखर कलगी तर अविनाश भुशिंगे यांनी आभार मानले.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथे दत्त कारखाना कार्यस्थळावर महा-ई-सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.