शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

टोल आंदोलकांवरील खटले मागे घेऊ : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:16 AM

‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे

ठळक मुद्दे पुन्हा आश्वासन : अंमलबजावणी का झाली नाही, पाहतोवीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवले

कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले.टोल आंदोलनातील कार्यकर्ते दिलीप देसाई, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, अशोक पोवार, किसन कल्याणकर अशा पाचजणांनी गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची उजळाईवाडी विमानतळावर भेट घेतली आणि खटले मागे घेण्याबाबत निवेदन दिले. देसाई यांनी विमानतळावर भेटण्याची विनंती केली होती. त्यानुसार कागलला कार्यक्रमास जाण्यापूर्वी दोन मिनिटे मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केली.

टोल आंदोलकांवरील खटले काढून टाकण्याचे आश्वासन आपण दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वारंवार आंदोलकांना न्यायालयात येरझाऱ्या माराव्या लागत आहेत. कार्यकर्त्यांची त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. तेव्हा आपण दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही केली जावी, अशी अपेक्षा दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखविली.त्याचवेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनीही साहेब करून घ्यायला लागतंय, या खटल्यात मलाही दंड झाला होता, याची माहिती दिली. त्यावेळी ‘माझ्या लक्षात आहे. खटले मागे घेण्याची अंमलबजावणी का झाली नाही हे मी तपासून घेतो आणि संबंधितांना तशा सूचना देतो’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह टोल विरोधात झालेल्या आंदोलनातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.वीजदरप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना टोलवलेप्रलंबित प्रश्न : निवेदन घेण्यासही टाळाटाळकोल्हापूर : कागल दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीसह पॉवर फॅक्टर पेनल्टीसंदर्भातील प्रलंबित प्रश्नात लक्ष घालावे म्हणून विनंती करायला गेलेल्या कोल्हापुरातील उद्योजकांची साधी दखलही घेतली नाही. निवेदन स्वीकारतो, चर्चा करतो म्हणून भेटीचे ठिकाण व वेळही दिली; पण प्रत्यक्षात निवेदनही स्वीकारले नाही. मुख्यमंत्र्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्योजकांनी स्वीय साहाय्यकांकडे निवेदनाची प्रत देऊन भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या टोलवाटोलवीबद्दल उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली.उद्योजकांनी आधी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून, दौºयात भेट घेण्याची परवानगीही घेतली होती. त्यानुसार सुरुवातीला विमानतळावर भेट घेण्याचे ठरले; पण विमान उशिरा येणार असल्याने कागलमध्ये पुतळा अनावरणाच्या ठिकाणी माळ बंगल्यावरच १५ मिनिटे चर्चा करू असे ठरले. त्याप्रमाणे आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले, कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अतुल आरवाडे या उद्योजकांच्या प्रतिनिधींनी दुपारी एक वाजता माळ बंगला गाठला. तेथे आल्यावर भेटीबद्दल विचारले असता, मेळाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर निवेदन स्वीकारू, असा निरोप स्वीय साहाय्यकाकडून आला. त्याप्रमाणे जयसिंगराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या मेळाव्याच्या ठिकाणी सर्व उद्योजक पोहोचले. भेट घेण्याचा प्रयत्न केल्यावर कार्यक्रम संपल्यावर बघू, असे सांगण्यात आले. कार्यक्रम संपल्या संपल्या लगेच मुख्यमंत्री बाहेर पडून गाडीत बसत असताना उद्योजकांनी गाठल्यावर मुंबईत या, निवांत चर्चा करू, असे सांगून ते रेठरे बुद्रुकच्या कार्यक्रमाला निघून गेले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस