: बेनिक्रे (ता. कागल) येथे गव्यांच्या कळपाकडून ऊस, मका, ज्वारी पिकांचा पडशा पाडला जात आहे. तसेच, दिवसाढवळ्या या गव्यांचा धुडगूस सुरू आहे.त्यामुळे शेतकरी, महिलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ गव्यांचा बंदोबस्त करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
गावच्या पश्चिमेला जाधववाडी वस्ती आहे. या वस्तीला लागूनच असणाऱ्या डोंगरात १५ ते २० गव्यांचा कळप वास्तव्यास आहे. तेथून हे गवे तलावाकडे पाण्यासाठी येतात. मात्र येता-जाता पिकांचे नुकसान करतात. तसेच या वस्तीवरील मुले गावातील शाळेकडे पायपीट करतात. त्यामुळे गव्यांकडून धोका होऊ नये. यासाठी त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. हे कळप अमोल चौगले, पाणी पुरवठा कर्मचारी आनंदा वाडकर यासह शेतकऱ्यांना वारंवार नजरेस पडत आहेत.
दरम्यान, यामध्ये विठ्ठल चौगले, महादेव चौगले, नारायण चौगले, युवराज बिराडे आधी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
कँप्शन-
बेनिक्रे येथे गव्यांकडून मका व ऊस पिकाचे झालेले नुकसान व शेतातील गव्यांच्या पायांचे ठसे.