कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मंगळवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई भक्तांना देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाला परवानगी देण्यात आली असून, गर्दीचे दिवस वगळता वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
कोरोनामुळे शंखतीर्थ चौकातून मुखदर्शन सुरू झाले हाेते. कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे व पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. येत्या काळात भूमिगत विद्युत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहनतळही जमिनीखालून केले जाणार असल्याचे केसकर यांनी सांगितले.