कोल्हापूर : देशात सध्या राजकीय परिवर्तनाची आवश्यकता आहे व त्यासाठी जे-जे आमच्या सोबत येतील, त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे जाहीर केले. या कार्यक्रमात पवार हे संजय मंडलिक यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत काही सूतोवाच करतील का, याबद्दल उत्सुकता होती; परंतु पवार यांनी त्यास सोयीस्कर बगल दिली.
दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कारांचे पवार यांच्या हस्ते येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर शानदार सोहळ्यात वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर अध्यक्षस्थानी होते. या समारंभात काही वक्त्यांनी ‘पवार यांच्या मनातलं काहीकळत नाही,’ अशी टिप्पणी केली होती. त्याचा संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘माझ्या मनातलं काही कळत नाही,’ असे म्हणणे हेच गमतीचे आहे; कारण माझ्या मनातलं माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कळतं. माझी राजकीय भूमिका स्वच्छ असते व राजकारणात असूनही व्यक्तिगत सलोखा ही वेगळी गोष्ट असते.
माझे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते; परंतु म्हणून मी कधी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही की, त्यांनी कधी माझ्या उमेदवारास पाठिंबा दिला नाही. राजकीय लाईन ठरलेली असते; परंतु जेव्हा महाराष्ट्राच्या व्यापक हिताचा विचार येतो, तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन काही पर्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. देशात सध्या राजकीय परिवर्तनाची गरज आहे असे चित्र दिसते. त्यामध्ये जे-जे आमच्या सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. तसा प्रयत्न मुंबईत काढलेल्या ‘संविधान बचाव मोर्चा’च्या निमित्ताने केला व त्यामध्ये खासदार राजू शेट्टी हेदेखील सहभागी झाले होते.
आमदार हसन मुश्रीफ यांना या समारंभात दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे मोठेपण सांगताना अश्रू अनावर झाले. मंडलिक यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत द्यावी, असे सूतोवाच त्यांनी केले. आमदार सतेज पाटील यांनीही संजय मंडलिक हे चांगले काम करीत आहेत. त्यांच्या तरुण नेतृत्वाला व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन करून अप्रत्यक्षपणे मंडलिक यांच्या उमेदवारीचीच घोषणा करून टाकली. गृहराज्यमंत्री केसरकर यांनी मात्र हा कार्यक्रम सर्वपक्षीयशेतकरी कर्जबुडव्या नव्हे !केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या बॅँकांना ८० हजार कोटींचे अनुदान दिले; तर बड्या उद्योगपतींची १ लाख २० हजार कोटी रुपयांची थकबाकी भरली. शेतकºयाची जात ही पैसे बुडविणाºयाची नव्हे. त्याने घेतलेल्या कर्जाचा पैसा परत करीत नाही तोपर्यंत त्याला चैन पडत नाही. एक दमडीसुद्धा तो थकवत नाही. परंतु हल्लीचे सरकार जे पैसे भरत नाहीत अशा वर्गाला संरक्षण देत आहे, असे पवार यांनी सांगितले.हा सुक्काळीचा काय सांगतोय..! : तुम्ही कोणती भूमिका, धोरण स्वीकारता हे महत्त्वाचे असते. त्याला प्रतिसाद बिंदू चौकातून मिळतो. मी माझ्या अनेक राजकीय दौºयांची सुरुवात बिंदू चौक येथून केली. तुमची भूमिका चांगली असेल तर बिंदू चौकात तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि ती चुकीची असेल तर ‘हा सुक्काळीचा काय सांगतोय..!’असे म्हणत विरोधही होतो. एकदा बिंदू चौकाने स्वीकारले की तो विचार महाराष्टÑात जातो. कोल्हापूर ही गुणांचे स्वागत करणारी नगरी आहे, असे पवार म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.मंडलिक संघर्षशील व्यक्तिमत्त्वशरद पवार आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यात राजकीय वितुष्ट आल्यानंतर जवळपास नऊ वर्षांनी पवार हे मंडलिक यांच्या व्यासपीठावर आले. त्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पवार म्हणाले, मंडलिक म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या राजकीय जीवनाचा बराचसा काळ माझ्यासोबत गेला. मी त्यांचे प्रेम पाहिले, संघर्ष पाहिला. त्यांची बांधीलकी ही सर्वसामान्य जनता आणि शेतकºयांशी होती.त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याची कोल्हापूरकरांची भूमिका यांमुळे त्यांना पाठबळ मिळाले. मंडलिकांनी माझ्याशीही संघर्ष करण्यात मागे-पुढे पाहिले नाही. विचारांशी बांधीलकी बाळगणारा नेता अशीच त्यांची प्रतिमा राहिली.