ते म्हणाले की कोल्हापूरतील एक मंत्री परवाच म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान देणारच. पण केव्हा देणार, हे मात्र सांगत नाही. यामध्ये शासन चालढकल करीत आहे. महाविकास आघाडीने दोन लाखापर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना लागू केली. परंतु यामध्येसुद्धा अजून काही लाभार्थी वंचित आहेत. तसेच दोन लाख रुपयांवरील कर्ज भरल्यानंतर दोन लाख रुपयांची कर्जमाफी ही घोषणा अद्याप हवेतच आहे. थकीत वीज बिलाबाबतही घुमजाव केले आहे. मागील वर्षी जाहीर केलेली सवलतीची घोषणा ऐनवेळी मागे घेतली आणि थकीत वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे, हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
शेतक-यांचा पन्नास हजार रुपये अनुदानाचा विषय अधिवेशनात घ्या : घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:15 AM