* * * * * * * * * * * *शिरोळ : इस्राईल देश कोविडमुक्त झाला त्याच पद्धतीने * * * * * * * * * * * * * * * * * * * * *शिरोळ तालुका कोविड मुक्त करण्यासाठी सर्वच घटकांनी सहकार्य करावे. कोविडच्या उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा बिलाची आकारणी करणाऱ्या खासगी रुगणालयांवर कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना खासदार धर्यशील माने यांनी * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *शिरोळ येथे आढावा बैठकीत दिल्या. * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *शिरोळ पंचायत समिती सभागृहात खासदार माने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात म्हणाले, जादा बिलाची आकारणी कोण करीत असेल तर संबंधितांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी द्याव्यात. धनाजी चुडमुंगे म्हणाले, शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत औषध उपचार होणे गरजेचे असताना काही हॉस्पिटल ज्यादा आकारणी करत असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शकंर कवितके, सभापती कविता चौगुले, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, वैभव उगळे, राजगोंडा पाटील, जयसिंगपूर नगराध्यक्षा नीता माने, मुख्याधिकारी निखिल जाधव, टीना गवळी, तैंमुर मुल्लानी उपस्थित होते
त्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:27 AM