बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने परीक्षा घेण्यात याव्यात. ऑफलाइन घेणे अडचणीचे असल्यास ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्यावी.
-तेजस पोवार, वळीवडे.
वर्षभर आम्ही अभ्यास केला आहे. पुढील शिक्षणाचा विचार करता परीक्षा होणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल, तर एक महिना परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
-सविता पटकारे, टाकाळा.
पालक म्हणतात?
दहावी, बारावीच्या परीक्षांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या परीक्षा घेण्यात याव्यात. कोरोनाबाबतची दक्षता घेत ऑफलाइन पद्धतीने परीक्षा व्हावी.
-बी. डी. ढोणे, पेठवडगाव.
गेल्या वर्षीही परीक्षा झालेल्या नाहीत. यंदाही झाल्या नाही तर शिक्षणाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अथवा ऑफलाइन परीक्षा घेऊन मूल्यमापन करावे.
-मीनाक्षी नाळे, सांगरूळ.
शिक्षक म्हणतात?
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शाळा, महाविद्यालयांमध्येच परीक्षा होणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाबतची दक्षता घेऊन परीक्षा घेता येतील.
-प्रा. डी. एस. काशीद, नाइट कॉलेज कोल्हापूर.
चौकट
शाळा, महाविद्यालयांमध्ये तयारी
दहावी, बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असून, सराव परीक्षा सध्या सुरू आहेत. वेळापत्रकानुसार दहावीची तोंडी परीक्षा सोमवार (दि. १२) पासून होणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षा झाल्यानंतर दहा दिवसांत घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, बारावीच्या परीक्षा केंद्रावर स्टेशनरी साहित्य पाठविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले.