समीर देशपांडे ।कोल्हापूर : केरळमध्ये फैलावलेल्या ‘निपाह’आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. आठ दिवसांत हे नमुने पुण्याला विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठवायचे आहेत.
केरळमध्ये ‘निपाह’च्या विषाणूंची लागण झाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रोगावर लस, उपचार उपलब्ध नसल्याने याचे गांभीर्य वाढले असून, त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनानेही पावले उचलली आहेत. डुकरे आणि वटवाघळांच्या माध्यमातून या रोगाचे विषाणू पसरत असल्याने या दोन घटकांवर लक्ष कें द्रित करण्यात आले आहे.
त्यानुसार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांचे रक्तनमुने घेऊन ते आठ दिवसांत पुण्याला चाचणीसाठी पाठवायचे आहेत. तसेच वटवाघळांच्या वस्तीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘मास्क’ घालून रक्त नमुने घ्या डुकरांचे रक्त नमुने घेतानाही ‘एनक्यू ५’ हे विशिष्ट प्रकारचे मास्क वापरूनच रक्त नमुने घेण्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले आहे.प्रत्येक तालुक्यासाठी पथक‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याला जलद प्रतिसाद पथक नेमण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये एक पशुसंवर्धन विभागाचा डॉक्टर आणि वटवाघळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याचाही एक कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.खाण्याचा सोडा, चुना फवारणीज्या ठिकाणी वटवाघळांची वस्ती आहे, अशा झाडांखाली खाण्याचा सोडा आणि चुन्याच्या भुकटीची फवारणी करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. वटवाघळांच्या विष्ठेतून या रोगाचा प्रसार होत असल्याने याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले असून, या फवारणीतून प्रसाराला प्रतिबंध होणार आहे.राज्यातील विदेशी डुकरे -३७,४५५राज्यातील देशी डुकरे - २,८८,३०१एकूण - ३,२५,७७६