शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

तीळगूळ घ्या, गोड बोला - मकरसंक्रांती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:21 AM

कोल्हापूर : आठवण सूर्याची.. साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तीळगूळ घ्या, गोड बोला म्हणत ...

कोल्हापूर : आठवण सूर्याची.. साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तीळगूळ घ्या, गोड बोला म्हणत प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आणणारी मकरसंक्रांत गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्येही सणाचा उत्साह होता, तर करवीर निवासिनी श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत विशेष बैठीपूजा मांडण्यात आली.

सूर्याचा मकरराशीत प्रवेश होतो तो दिवस मकरसंक्रांत म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त गुरुवारी श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यातील सुंदर पूजा बांधण्यात आली होती. घराघरांत सुवासिनींनी बुडूकलीत बोरं, ऊस, गाजर, वटाणे, शेंगा, तीळगूळ घालून औसा पूजन केले. शिवाय पुरणपोळी, शेंगदाण्याची पोळी असा गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. एरवी कोणत्याही सणाला निषिद्ध असलेले काळे कपडे मकरसंक्रांतीला मात्र आवर्जून घातले जातात. त्यामुळे महिलांनी काळ्या साड्या, टाॅप्स, पंजाबी ड्रेस घातले होते. महाविद्यालयांमध्ये मुलींनी साड्या घालून पारंपरिक वेशभूषा केली होती. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत सुरू झालेल्या वर्गांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून मित्र-मैत्रिणींना तीळगूळ देण्यात आले.

नव्या वर्षात कोरोनाचा संसर्ग एकदमच आटोक्यात आल्याने या सणाचा नागरिकांनी आनंद लुटला. सायंकाळी शेजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना तीळगूळ देण्यात आले.

--

समाजमाध्यमांवरदेखील शुभेच्छा

यानिमित्त समाजमाध्यमांवरदेखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भोगीची भाजी-भाकरी, तीळगुळाच्या वड्या, मैत्रिणींसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत हा दिवस साजरा करण्यात आला.

--

फोटो नं : १४०१२०२१-कोल-अंबाबाई०१,०२

ओळ : मकरसंक्रांतीनिमित्त गुरुवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांमधील सालंकृत बैठीपूजा बांधण्यात आली. हे दागिने सुमन कुमठेकर यांनी बनवले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)