कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडे संगणक प्रणालींचे सोर्स कोड असेल, तर देखभाल-दुरुस्तीचा खर्च कशासाठी केला जातो. त्याबाबत चौकशी करुन माहिती सर्वांसमोर मांडण्यात यावी. त्यामध्ये दोषी आढळणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेने गुरुवारी केली. यासह विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले.‘संगणक केंद्रात चाललंय काय?’ या वृत्तमालिकेतून ‘लोकमत’ने विद्यापीठातील संगणक केंद्राच्या कामकाजाबाबतचे विविध मुद्दे मांडले होते. त्याची दखल घेत आणि विद्यार्थ्यांकडून झालेल्या तक्रारींची माहिती घेवून मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ. शिर्के यांची भेट घेतली. संगणक केंद्रात कायमस्वरुपी संचालकांची तत्काळ नियुक्त करावी. वारंवार डाऊन होणाºया सर्व्हरचा प्रश्न मार्गी लावावा.
विविध अधिविभागांमध्ये अनेक संगणक नादुरुस्त असून ते दुरुस्त करावेत. संगणकप्रणालींचा सोर्सकोड असेल, तर देखभाल-दुरुस्तीचा खर्च करण्यात येवू नये, आदी मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या. शिष्टमंडळात संघटनेचे शहरअध्यक्ष ऋतुराज माने, ‘मनविसे’चे शहर अध्यक्ष मंदार पाटील, केदार माने, आदित्य हुलजी, महेश राठोड, धनराज माने, सुशांत माने, सिद्धांत गुडाळे, सुजय उलपे, संकेत माने, यश पाटील यांचा समावेश होता.कुलगुरुंबरोबर चर्चा करणारसंगणक केंद्रासाठी पूर्णवेळ संचालकांची नियुक्ती लवकर करण्यासह सर्व्हरचा प्रश्न सोडविण्यात येईल. संघटनेने मांडलेल्या अन्य मुद्यांबाबत कुलगुरुंबरोबर चर्चा केली जाईल, असे आश्वासन डॉ. शिर्के यांनी दिले.
संगणक केंद्राबाबत संघटनेने मांडलेल्या मागण्यांबाबत विद्यापीठाने सकारात्मक कार्यवाही लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.-ऋतुराज माने