शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापूरचे पालकमंत्री असे का म्हणाले? खताचे लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 1:12 PM

कोल्हापूर : जिल्ह्यात खताचे लिंकिंग होता कामा नये. खताचे लिंकिंग करणा-या कृषी सेवा केंद्रावर, खत कंपन्यांवर कठोर कारवाई करा, ...

ठळक मुद्देसतेज पाटील; संभाव्य पूर परिस्थितीबाबत आतापासून नियोजन

कोल्हापूर : जिल्ह्यात खताचे लिंकिंग होता कामा नये. खताचे लिंकिंग करणा-या कृषी सेवा केंद्रावर, खत कंपन्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिले. पुराचा धोका संभवल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर केले जाईल. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय समन्वय ठेवून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांचे आतापासून नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा घेतला. या परिषदेद्वारे घेतलेल्या बैठकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सहभाग घेतला. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन आतापासूनच पूर व्यवस्थापन संबंधितच्या उपाययोजना व्हाव्यात, अशी सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मांडली. त्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकाºयांशी पाटबंधारे विभागामार्फत सुयोग्य समन्वय ठेवला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शेतकºयांना खत पुरवठा करण्यात हेतुपुरस्सर हयगय आणि टाळाटाळ करणा-या कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केला जाईल.

शेतकºयांनी खताच्या लिंकिंगबाबत काही तक्रारी असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२३१-२६५२०३४ किंवा  dsÔokolhÔpur@gmÔil.com ङ्मे मेल आयडीवर करावी. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना त्यांच्या मागणीनुसार खत उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, जिल्हा समन्वयक अधिकारी संजय शिंदे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहुल माने, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, एमएससीबीचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, आदी सहभागी झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी स्वागत केले. कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले.तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्दभरारी पथकांमार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करून शेतकºयांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळेल याची व्यवस्था केली आहे. या पथकाच्या तपासणीत दोषी आढळलेल्या राधानगरी तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 

 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर