शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गडहिंग्लजच्या महावितरण गेटला ताला-ठोक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 7:57 PM

MahaVitran, Morcha, Gadhinglaj, kolhapurnews दरमहा ३०० युनीटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीजग्राहकांची वीजबीले तातडीने माफ करा, अशी मागणी जनता दलातर्फे करण्यात आली. या मागणीसाठी गडहिंग्लज येथील महावितरण कार्यालयाच्या गेटला टाळे लावून ताला -ठोक आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या महावितरण गेटला ताला-ठोक आंदोलन घरगुती वीजबीले त्वरीत माफ करा, जनता दलाची मागणी 

गडहिंग्लज : दरमहा ३०० युनीटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीजग्राहकांची वीजबीले तातडीने माफ करा, अशी मागणी जनता दलातर्फे करण्यात आली. या मागणीसाठी गडहिंग्लज येथील महावितरण कार्यालयाच्या गेटला टाळे लावून ताला -ठोक आंदोलन करण्यात आले.शहरातील कडगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहापासून महावितरण कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. कार्यालयाच्या गेटसमोर आल्यानंतर आंदोलकांनी गेटला टाळे लावले आणि जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलकांना नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी मार्गदर्शन केले.नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, देशातील केरळसह अन्य राज्यात वीजबीलात ५० टक्के सवलत देवून नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनामुळे जगणे मुश्किल झालेल्या नागरिकांच्या घरगुती वीजदरात वाढ केली आहे. हे अन्यायी धोरण आहे. राज्यातील पुरोगामी शासनाने घरगुती वीजबीले माफ करून आपले पुरोगामित्व सिद्ध करावे.नाईक म्हणाले, कोरोना संकटकाळात नागरिकांचे व्यवसाय बंद पडले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अशा काळातील वीजबीले माफ झाली पाहिजेत. शासनाने वीजबीले तात्काळ माफ करावीत अन्यथा भविष्यात उग्र आंदोलन छेडले जाईल.उपनगराध्यक्ष कोरी म्हणाले, घरगुती वीज ग्राहकांची वीजबीले माफ करण्याची मागणी रास्त आहे. लॉकडाऊन काळातील वीजबीलांमध्ये १ ते १०० युनीट आणि १०० ते ३०० युनीटच्या आकारणीमध्ये केलेली साडेसोळा टक्के आणि साडेतेरा टक्केंची दरवाढ अन्यायकारक आहे. वीजबीलात सवलत देण्याची घोषणा करणारे सरकार फसवे आहे.यावेळी महावितरण अभियंता दांगट यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सपोनि दिनेश काशीद यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलनात नगरसेवक उदय कदम, क्रांतीदेवी शिवणे, शकुंतला हातरोटे, सुनिता पाटील, नाज खलिफा, हिंदूराव नौकुडकर, काशिनाथ देवगोंडा, बाळकृष्ण परीट, मालतेश पाटील, शशीकांत चोथे, रमेश मगदूम, रमेश पाटील, अवधूत पाटील, सागर पाटील, प्रकाश तेलवेकर, मोहन भैसकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMorchaमोर्चाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर