शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

सीमा भागातील तालुक्यांचा कायापालट होणार

By admin | Published: February 13, 2015 1:11 AM

पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रकल्प : दोडामार्ग, सावंतवाडीचा विकास शक्य

नीलेश मोरजकर - बांदा -मोपा विमानतळामुळे महाराष्ट्र-गोवा या सीमा भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, पर्यायाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांचा आणि परिसरातील गावांचा विकास होण्यास मदतच होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट होईल, आणि परिसरात विकासाची गंगा येणार असल्यामुळे रोजगारवृध्दीही होईल. गोवा सरकारनेही या प्रकल्पाबाबत तेथील नागरिकांचीही मते जाणून घ्यावीत, अशी सीमा भागातील नागरिकांची मागणी आहे. सीमेवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या विकास आराखड्यात पेडणे, बांदा शहरांचा समावेश आहे. मोपा प्रकल्प हा बांदा शहरापासून केवळ ६ किलोमीटर अंतरावर आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे सीमा भागाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास होणार आहे. या प्रकल्पाचा फायदा बांद्यातील व्यापारी पेठ व शहरातील पर्यटन स्थळांना होणार आहे. गोवा राज्यात भाजपाची सत्ता असून बांदा शहरातही भाजपाची सत्ता आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे उत्तर गोव्यातील असून त्यांचे बांदा शहराशी नाते आहे. बांदा येथील लोकोत्सव कार्यक्रमात प्रा. पार्सेकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी मोपा विमानतळ प्रकल्पाचा बांदावासीयांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत त्यांच्याशी चर्चा करून या प्रकल्पात सीमावासीयांना देखील सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बांदा गावच्या सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले.लोकमत विशेष-२