जयसिंगपूर : वडील व भावाच्या निधनानंतर खचून न जाता एक एकर क्षेत्रात केळीचे भरघोस उत्पादन घेऊन हा माल सौदी अरेबिया येथे एक्सपोर्ट करुन इतर शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. हा पराक्रम तमदलगे (ता. शिरोळ) येथील तरूण शेतकरी आदेश दीपक खाडे यांनी केला आहे.
वडील दीपक खाडे व भाऊ आकाश खाडे यांच्या निधनामुळे आदेश यांनी खचून न जाता शेतजमीन हीच आपली माय मानली. ते आधुनिक शेतीकडे वळले. उच्च दर्जाचे बियाणे निवडून एक एकर क्षेत्रात योग्य नियाेजन करून केळीची चांगली बाग फुलवली. वेळोवेळी पाणी, खताची योग्य मात्रा दिल्याने आता या बागेतून चांगल्या प्रतीची केळी निघत आहेत. ही केळी मुंबई येथून बोटीव्दारे सातासमुद्रापार सौदी अरेबिया याठिकाणी एक्सपोर्ट केली जात आहेत.
चौकट - कृषी पदविकाचे शिक्षण
आदेश हे शेतीतील शिक्षण घेत असून, ते सध्या कृषी पदविका करीत आहेत. तळसंदे येथे डी. वाय. पाटील कृषी अॅग्रिकल्चर या महाविद्यालयात ते शिक्षण घेत आहेत.
कोट - केळीच्या उत्पादनासाठी माजी सरपंच पिरगोंडा पाटील, शेतकरी उमेश पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे केळीचे भरघोस उत्पादन घेऊ शकलो. यामुळे माझे वडील व भावाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
- आदेश खाडे, युवा शेतकरी तमदलगे फोटो - २५१२२०२०-जेएवाय-०३
फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथील आदेश खाडे यांनी पिकविलेली केळी पॅकिंग करुन सौदी अरेबिया येथे एक्सपोर्ट केली जात आहेत.