शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

ताराबाई पार्कात बंगला फोडला

By admin | Published: February 14, 2016 12:54 AM

सात लाखांचा ऐवज लंपास : नागरिकांमध्ये भीतीचे सावट

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून शहरासह उपनगरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. चोरट्यांनी रुईकर कॉलनी पाठोपाठ ताराबाई पार्क येथील बंद बंगला फोडून सोन्या-चांदीचे दागिने व किमती मोबाईल असा सुमारे सात लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे शुक्रवारी रात्री उघडकीस आले. चोरट्यांचे पोलिसांना आव्हान बनले असून, भीतीचे सावट पसरले आहे. प्रकाश बळिराम शिंदे (वय ५८) यांचा ताराबाई पार्क, रेसिडेन्सी क्लबसमोर, यशोविद्या अपार्टमेंट शेजारी ‘प्रियाय’ हा बंगला आहे. ते आणि पत्नी साधना असे दोघेच राहतात. २३ जानेवारीला शिंदे दाम्पत्य व त्यांची मुलगी सौदामिनी असे तिघेजण मुंबई येथे राहणारी मोठी मुलगी प्रणाली हिच्याकडे राहण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याचे सर्व दरवाजे बंद केले होते. शुक्रवारी रात्री ते कोल्हापुरात परतले. घरी आल्यानंतर त्यांनी दर्शनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो आतून बंद असल्याचे दिसले. त्यांना बंगल्याशेजारी असलेल्या इनोव्हा गाडीवर पायांचे ठसे दिसले. त्यामुळे जावई यश सोळंकी हे इनोव्हा गाडीवरून दूसऱ्या मजल्यावर गेले. येथील दरवाजाचा लोखंडी ग्रिलचा कोपरा वाकलेला दिसला. तसेच काचही फोडली होती. चोरीची शंका वाटल्याने त्यांनी दर्शनी दरवाजा जोरात ढकलून उघडला असता हॉलमधील दोन किमती मोबाईल गायब असल्याचे दिसले. तसेच बेडरूममधील कपाटातील साहित्यही विस्कटलेले होते. त्यामधील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे दिसले. या प्रकारानंतर शिंदे यांनी शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनी लोखंडी दरवाजा, कपाटावरील चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. रुईकर कॉलनीतील बंद बंगला फोडून चोरट्यांनी सात लाख किमतीचा ऐवज लंपास केला होता. या घरफोडीतील चोरट्यांनी हा बंगला फोडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दोन्ही बंगले एकाच रात्री फोडले आहेत.