शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तारादूतांना मिळाली शाहूकार्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 1:34 PM

मराठा मोर्चाच्या मागणीनंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुण्यात स्थापन झाली. या संस्थेअंतर्गत स्त्री-पुरुष समानता, जातीय सलोखा, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांवर जनजागृती करण्यासाठी व स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी

ठळक मुद्दे-अभ्यास सहलीत ऐतिहासिक स्थळांना भेटी

कोल्हापूर : बहुजनांचे कैवारी, समाजोद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ, न्यू पॅलेसची वास्तू, खासबाग, ऐतिहासिक दसरा चौक, भवानी मंडप अशा राजर्षींच्या कार्याचा वसा आणि वारसा जपलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत बुधवारी ‘सारथी’च्या तारादूतांनी शाहू विचारांचा जागर केला. भवानी मंडपात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ताराबाई व शाहू महाराज यांच्यावर व्याख्यान दिले.

मराठा मोर्चाच्या मागणीनंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुण्यात स्थापन झाली. या संस्थेअंतर्गत स्त्री-पुरुष समानता, जातीय सलोखा, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांवर जनजागृती करण्यासाठी व स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी तारादूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांच्या नावाने संस्था सुरू झाली आहे, त्या शाहू महाराजांच्या कार्याची माहिती या तारादूतांना व्हावी, यासाठी दोन दिवसांच्या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ३२३ तारादूत कोल्हापुरात आले आहेत.

बुधवारी दुपारी त्यांनी कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळाला भेट दिली. यावेळी प्रकल्प संचालक अशोक पवार व नितीन हांडे यांनी अभ्यास सहलीचे महत्त्व विशद केले. इतिहास अभ्यासक इंंद्रजित माने यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. यानंतर न्यू पॅलेसला भेट देण्यात आली. येथे शाहू छत्रपती यांनी या तारादूतांशी संवाद साधला.

कोल्हापूर पुरालेखागार, टाऊन हॉल म्युझिअम, दसरा चौकनंतर सायंकाळी भवानी मंडप परिसरात तारादूतांनी पथनाट्य सादर केले. यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ताराबाई व शाहू महाराज या विषयावर व्याख्यान दिले. प्रमुख पाहुण्या म्हणून संयोगिताराजे छत्रपती होत्या. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.आज, गुरुवारी पन्हाळा, राधानगरीला भेट देण्यात येणार आहे. शुक्रवारी कोल्हापुरातील उर्वरित वास्तूंना भेट देऊन अभ्यासदौऱ्याची सांगता होईल.उपमुख्य कार्यालयाची मागणी लावून धरणारयावेळी इंद्रजित सावंत म्हणाले, शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजे असल्याने ‘सारथी’चे मुख्य कार्यालय येथेच व्हावे, अशी आमची मागणी होती. मात्र ते पुण्याला झाले. आता उपमुख्य कार्यालय कोल्हापुरात व्हावे, ही मागणी आम्ही नव्या सरकारकडे लावून धरणार आहोत. तसेच मोठ्या प्रमाणात निधी मिळावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर