कोल्हापूर : राजाराम गायकवाड यांच्यामुळे प्रभागाची शहरात बदनामी झाली. आता पुन्हा त्याच व्यक्तीला उमेदवारी दिल्याने ताराराणी व भाजपचा खरा चेहरा उघडकीस आला आहे, अशी घाणाघाती टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. रमणमळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणपती पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, ताराराणी व भाजप आघाडीसोबत येथील विद्यमान नगरसेवक राजाराम गायकवाड गेले आहेत; पण मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा विचार भाजप सरकारचा आहे. मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय गायकवाड यांना मान्य आहे का? असा सवाल कोल्हापुरात अपक्षांची सत्ता उलथवून टाकून पक्षीय राजकारण सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला; पण महापालिकेवरील राजकीय वर्चस्व कमी होईल, या भीतीने याच मंडळींनी त्याला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देताना पैसेवाला आहे काय? किती खर्च करणार याचा विचार न करता ‘दोन नंबर’ नसणाऱ्यांना उमेदवारी दिली. यावेळी प्रा. जयंत पाटील, राजू लाटकर, अविनाश पाटील, कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.
ताराराणी, भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला
By admin | Published: October 24, 2015 1:04 AM