कोल्हापूर- गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली असून सध्या तिच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आली असून तिच्यावर सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा दिली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, शिक्षिका अश्विनी देवाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी अजूनही या शिक्षिकेवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.