कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने व अटीतटीने पहिल्यांदाच मतदान झाल्याने निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, गुरुवारी पुणे येथे मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. उमेदवारांची संख्या, त्यात पसंती क्रमांकामुळे मतमोजणीला उशीर लागणार असून, गुलालासाठी उद्या, शुक्रवारची प्रतीक्षा उमेदवारांसह समर्थकांना करावी लागणार आहे.
पुणे पदवीधर मतमोजणीला दुपारी वाजता सुरुवात झाली असून प्रथम पसंतीची मतमोजणी सुरु झाली आहे. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मुसंडी मारली असून भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी आघाडी घेतली आहे. पुणे पदवीधरसाठी यावेळेला ६२ जण रिंगणात होते. नोंदणीपासून मतदानापर्यंत येथे चुरस पाहावयास मिळाली. तब्बल २ लाख ४५ हजार २५५ मते झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक ६० हजार ९६४ मते नोंदली गेली. ह्यशिक्षकह्णमध्ये ३५ जणांनी आपले नशीब आजमावले. येथे पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर निवडणूक लढविली गेल्याने प्रचंड ईर्षा पाहावयास मिळाली. येथे ५२ हजार ७११ मते झाली असून, यामध्ये १० हजार ६०९ मते ही कोल्हापुरातील आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा राबविली होती. त्यामुळे येथे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यात शिक्षकमधून प्रा. जयंत आसगावकर हे स्थानिक उमेदवार असल्याने उत्कंठा ताणली आहे. आज मतमोजणी सुरू झाली असली तरी उमेदवारांची संख्या व पसंती क्रमांकांमुळे मोजणीस वेळ लागणार आहे. पहिल्या पसंतीची मते मोजण्यासाठी रात्री आठ वाजतील. साधारणता संपूर्ण निकाल लागण्यासाठी शुक्रवार उजाडणार हे निश्चित आहे.पहिल्या पसंतीत कोटा अशक्यचपदवीधरसाठी १ लाख २२ हजार ६२८, तर शिक्षकसाठी २६ हजार ३५६ मतांचा कोटा आहे. मात्र, निवडणुकीतील चुरस व मतांसाठी लावलेल्या जोडण्या पाहता पहिल्या पसंतीत कोटा पूर्ण करताना दमछाक होणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत चौथ्या फेरीपर्यंत झुंजावे लागण्याची शक्यता आहे.सामान्य माणसातही उत्सुकताप्रचाराच्या निमित्ताने पहिल्यांदाच सामान्य माणूस थेट या निवडणूकीत सहभागी झाला होता. त्यामुळे निकालाविषयी सामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.