पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील कुमार-कन्या शाळेतील चौथीच्या मुलींशी असभ्य वर्तन करणाऱ्या व पोस्को अंतर्गंत गुन्हा नोंद झालेला दिव्यांग शिक्षक नामदेव मारूती पोवार (वय ४९) यांना पन्हाळा पोलिसांनी शनिवारी रात्री ११.३० वाजता राहत्या घरातून अटक केली. कोल्हापूर न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.शनिवारी काही पालक फिर्यादीसाठी पुढे आल्यानंतरचं रात्री उशीर गुन्हा नोंद झाला.आठवडाभर दबलेल्या घटनेचा मिडीयांने स्ट्रिंग ॲापरेशन करून धक्कादायक घटना उघडकीस आणली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली. शनिवारी पन्हाळा पोलिसांनी पोर्ले ग्रामपंचायतीत मुलींच्या पालकांकडे कसून चौकशी केली. सुरूवातीला गंभीर प्रकरणाबाबत कोणीच पालक बोलायला तयार नसल्याने या प्रकरणाबाबत गोची झाली होती.
त्यानंतर पालकांनी पोवार यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. रविवारी शाळेला सुट्टी असताना तपास अधिकारी शैलेजा पाटील यांनी कन्या शाळेला भेट देऊन चौथीच्या वर्गाची पाहणी केली आणि मुख्याध्यापकांच्याकडे प्रकरणाची चौकशी केली.शिक्षण विभागाकडून बदलीची कारवाईग्रामपंचायतीने मंगळवारी संबधित शिक्षकांचे शाळेत वागणूक चांगली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र पोलिस, शिक्षण विभाग, पंचायत समितीला दिले होते. दबलेले प्रकरणाचा मीडीयाने उघडकीस आणल्यानंतर संगळी यंत्रणा कामाला लागती. तत्पूर्वी चार दिवस दुर्लक्षीत होते. त्यानंतर शिक्षण विभागाने तात्काळ पोवार यांची बदली चंदगडला केली.