राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४७ लाख ४६ हजार रुपयांचे केलेले नुकसान वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्याने ‘गुरुजीं’चे धाबे दणाणले आहे.
शिक्षक बँकेने चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याने रिझर्व्ह बँकेने दोनवेळा आर्थिक दंड केला. लेखापरीक्षकांना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील तपासणीत ठपके ठेवले होते. त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पुढील कारवाईबाबत अहवाल सादर केला होता. त्यानुसार आॅक्टोबर २०१६ मध्ये बँकेची ‘कलम ८३’नुसार चौकशी करण्यासाठी करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे यांना प्राधीकृत करण्यात आले. त्यांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या कामकाजातील प्रमुख चौदा मुद्द्यांची सखोल चौकशी केली. त्यामध्ये एकरकमी परतफेडी योजनेतंर्गत संचालकांनी सहा खातेदारांना नियमबाह्य २ लाख २२ हजार ४३० रुपयांची विशेष सवलत दिल्याचे स्पष्ट झाले.
बँकेच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४९ लाख १४ हजार ९१९ रुपये नफा झाल्याचा दिसतो, पण त्यावर २ टक्क्यांप्रमाणे ३५ लाख २३ हजार ५८८ रुपये सभासदांना लाभांश वाटप केला आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९, ‘कलम ३५’ नुसार रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत पूर्वपरवानगीशिवाय लाभांश वाटप केल्याने दहा लाखांचा दंड केला. ४७ लाख ४६ हजारांचे नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. हा अहवाल सुनील धायगुडे यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे दिला. यानुसार जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी चौकशी करून संचालकांवर जबाबदारी निश्चितीचे आदेश शुक्रवारी दिले.‘८३’च्या चौकशीतील ठपकेएन.पी.ए. तरतूद, व्याजाची चुकीची केलेली तरतूद, आयकर कायद्याप्रमाणे झीज आकारणी नाही, आॅडिट फीची तरतूद, निवडणूक खर्च, मुदत संपलेल्या ठेवींवर देणे व्याज तरतूद.यांच्यावर होणार जबाबदारी निश्चितीराजाराम वरूटे, वसंत जोशिलकर, रवीकुमार पाटील, सुभाष निकम, रघुनाथ खोत, पांडुरंग केणे, बळवंत पाटील, रावसाहेब देसाई, राजमोहन पाटील, दगडू पाटील, रामचंद्र मोहिते, वसंत जाधव, उत्तम सुतार, शंकर भोई, सुरेश कांबळे, रंजना माळी, कावेरी चव्हाण, रत्नमाला खेमाजी, बाळासो पाटील, सुधाकर शिवुडकर, बजरंग लगारे, नामदेव रेपे, आण्णासो शिरगांवे, गणपती पाटील, संभाजी बापट, साहेब शेख, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, प्रसाद पाटील, अरुण पाटील, धोंडिराम पाटील, प्रशांतकुमार पोतदार, सुरेश कोळी, बाजीराव कांबळे, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील. अधिकारी - आनंदराव शिंदे (सीईओ), मोहन भारते (सीईओ), मधुकर भालकर (अकौंटट), दिलीप खराडे (अकौटंट).चार महिन्यांनंतर ‘८८’ची कारवाईसुनील धायगुडे यांनी ‘८३’चा अहवाल मार्च महिन्यात जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता. त्यानंतर ‘कलम ८८’ नुसार जबाबदारी निश्चितीची कारवाई करण्यासाठी४ महिन्यांचा कालावधी लोटला.एकरकमी परतफेड नियमबाह्य सूट -२ लाख २२ हजार ४३०नियमबाह्य लाभांश वाटप -३५ लाख २३ हजार ५८८लाभांश वाटपावर झालेला दंड - १० लाख